प्राथमिक अंदाजानुसार 106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक‍ निवडणुकीसाठी आज सरासरी 76 टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69 टक्के मतदान झाले. तसेच महानगरपालिकांच्या तीन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 38 टक्के आणि ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 73 टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित केलेल्या जागा वगळून उर्वरित सर्व जागांसाठी आज हे मतदान झाले.

जिल्हानिहाय नगर पंचायत निवडणुक मतदानाची टक्केवारी

अहमदनगर जिल्हा – एकूण मतदान 82.17 टक्के
अकोले – 80.69 % कर्जत –80.20 % पारनेर – 86.09 %
नाशिक जिल्हा – एकूण 76.48 टक्के
पेठ- 80.63 % सुरगाणा-75.50 % कळवण-74.15 %
देवळा-78.34 % निफाड-73.64 % दिंडोरी-79.90 %
नागपूर जिल्हा – एकूण 75.51 टक्के
कुही – 77.9 % हिंगणा – 73.6 %

अधिक वाचा  ओमिक्रॉनवर येत आहे पुण्यात पहिली स्वदेशी लस

सातारा जिल्हा – एकूण 75.27 %
लोणंद- 72.17 % कोरेगाव-73.56 % पाटण- 73.55 %
वडूज-75.11 % खंडाळा-85.35 % दहिवडी-79.27 %
बुलडाणा जिल्हा
मातोळा – 79.63 % संग्रामपूर – 83.60 %

यवतमाळ जिल्हा – 6 नगरपंचायती 80 टक्के मतदान

बाभूळगाव – 81.76 % महागाव – 80.64 %

मारेगाव – 80.98 % झरी – 88.32 %

कळंब – 76.19 % राळेगाव -73.79 %

वर्धा जिल्हा – एकूण 76.46 टक्के मतदान
कारंजा – 78.16 % आष्टी – 72.09 %
सेलू – 74.54 % समुद्रपूर – 82 %

सिंधुदुर्ग जिल्हा – एकूण 75 टक्के मतदान
वैभववाडी – 81.86 % दोडामार्ग – 81.86 %
कुडाळ – 72 % देवगड – 70.91 %

अधिक वाचा  महाभारतातील कृष्ण अभिनेता नितीश भारद्वाज यांचा 12 वर्षानंतर घटस्फोट

सोलापूर जिल्हा
नातेपुते – 76 % माढा – 77 %
माळशिरस 79 %
महाळुंग-श्रीपूर – 73 %

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 6 नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं. या सहा नगर पंचायतींसाठी मिळून एकूण 76.20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव नगरपंचायतीसाठी एकूण 80.98 % मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 9 नगर पंचायतींसाठी 75.41 % मतदानाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी, मोहाडी आणि लाखंदूर नगर पंचायतींसाठी 72 % मतदानाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीसाठी 70.70 %, तर भातकुली नगर पंचायतींसाठी 81.61 % मतदान झाले.