मुंबई :  राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतींसाठी आणि 2 जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. तसेच  भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठीही आज मतदान होणार आहे. आज अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कोकणातल्या दापोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे.

तसेच रोहित पवार, रोहित पाटील, यशोमती ठाकूर, भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांधील ओबीसी समाजाचं २७ टक्के आरक्षण रद्द सुप्रीम कोर्टाने रद्द केलंय.

स्थगित झालेल्या नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या निवडणुकांसाठीचा कार्यक्रम शुक्रवारी आयोगाने जाहीर केला. त्यानुसार ओबीसीतून खुल्या प्रवर्गात गेलेल्या या जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे.

अधिक वाचा  स्वाधार योजनेच्या अर्जसाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ