मुंबई : बळीराजा शेतात राबतो तो त्याचा पिकांसाठी आणि मुलांसाठी. पिकांच्या उंचीवर त्याच्या कुटुंबातील आनंद दडलेला असतो. पण ज्या मुलांसाठी शेतकरी मातीत राबतो ती मुलं जेव्हा त्याची मान उंचावतात तेव्हा त्याला सर्वोच्च आनंद होतो. असा आनंद एका शेतकऱ्याला त्याच्या 17 वर्षांच्या मुलीने दिलाय.

शिक्षणच माणसंच आयुष्य बदलणार, हे विधान पुन्हा एकदा खरं ठरताना दिसत आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या 17 वर्षांच्या मुलीला अमेरिकेतील टॉप विद्यापीठाने 3 कोटी रूपयांची स्कॉलरशीप जाहीर केलीय. या मुलीला जर स्कॉलरशिप 3 कोटींची असेल तर तिचा पगार किती असेल? याची चर्चा जोरदार रंगली आहे.

अधिक वाचा  केपटाऊन: भारत पराभवाची चार कारणं, टीम इंडिया कुठे चुकली

मुलीने फेडले बापाचे पांग 

तामिळनाडूतील एका छोट्याशा खेड्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने देशाचे नाव उंचावले आहे. 17 वर्षीय मुलीला शिकागो विद्यापीठाने 3 कोटी रुपयांची संपूर्ण शिष्यवृत्ती देऊ केली आहे. जे जगातील सर्वोत्तम 10 विद्यापीठांपैकी एक आहे.