मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप अद्याप देखील सुरूच आहे. एसटीच्या विलीनीकरणावर राज्य शासनाला समिती गठीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊन प्राथमिक अहवाल 20 डिसेंबर रोजी मागितला होता. कोर्टाने नेमलेली समिती आज कोर्टात प्रार्थमिक अहवाल सादर करणार आहे.आज (20 डिसेंबर) उच्च न्यायालयात संपाबद्दल असलेल्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप 20 डिसेंबर पर्यंत असाच ठेवावा तसेच विलीनीकरण पक्के असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या सुनावणीतून आज एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरणाचाच निर्णय होणार, अशाप्रकारच्या पोस्ट संपकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांच्या ग्रुपवर व्हायरल होत आहेत.

अधिक वाचा  पुण्यात 10 हजारांहून अधिक रुग्ण; सलग ३ दिवस Corona चा विस्फोट?

एसटी विलीनीकरणावर आज कोर्टात सुनावणी

एसटी महामंडळाने हा संप मोडून काढण्यासाठी अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई केली. तर वेतनवाढही दिली. इतकेच नाही तर मेस्मा लावण्याचा इशाराही दिला. तरी देखील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. दरम्यान, विलीनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने एक समिती नेमली आहे. त्याला १२ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. या समितीला आज प्राथमिक अहवाल मागितला आहे. त्यामुळे २० डिसेंबरला विलीनीकरणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडेच कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.