पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकर हे अत्यंत प्रखर राष्ट्रहित जपणारे होते. ते स्वयंभू होते, ते स्वतंत्र विचाराचे होते. सावरकरप्रती स्वदेशी वस्तुंच्या वापराबददल आस्था होती, प्रेम होते त्यामुळे पुण्यामध्ये १९०५ मध्ये पहिली विदेशी कपडयांची होळी केली. त्याकरिता सावरकरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत निर्माण केली. पूर्ण स्वातंत्र्य हे त्यांचे ध्येय आणि ध्यास होता. असे प्रतिपादन अभिनेते प्रा. योगेश सोमण यांनी केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित महर्षी कर्वे व्याख्यान मालेत पहिले गुप्प गुपंताना व्याख्यान झाले. यावेळी सोमण म्हणाले, भारताच्या ७५ वर्षाच्या स्वातंत्र्या काळात सर्वांच्या भावना या सकारात्मक होत्या. त्यामुळे राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेम सर्वांच्या मध्ये ठायी भरला होता. यामध्ये अनेक निनावी लहान-मोठ्या व्यक्तींनी आपला खारीचा वाटा उचलला होता. त्यामुळे आपण ७५ वर्षाच्या आपण भारतदेशाचा इतिहास पहात आहोत. आपल्या व्याख्यानाच्या उतरार्थात त्यांनी स्वातंत्रवीर सावरकरांचे विचार समाजात प्रेरणादायी आहे. म्हणून ते समाजाने आत्मसाथ करणेची व समाजापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे प्रा. सोमण यांनी नमूद केले. व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रा. सोमण यांनी संस्थेचा इतिहास सांगताना भारतरत्र महर्षी कर्वे, बाया कर्वे, पार्वतीबाई आठवले यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या निधीसंकलनाच्या कार्याचा गौरव केला. व्याख्यानानंतर द प्लॅन या दोन अंकी नाट्यप्रयोगामध्ये रेंड व जॅक्सन बध याचे सादरीकरण करण्यात आले.

अधिक वाचा  वारज्यात मनपाच्या दप्तर दिरंगाईने वाहतूक कोंडी; काँग्रेस योग्य कार्यवाहीसाठी आग्रही

यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, कार्याध्यक्ष रविंद्र देव, उपकार्याध्यक्ष विदया कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तवितक कार्याध्यक्ष रविंद्र देव यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कांचन समेळ यांनी केली. या कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक, देणगीदार व्यवस्थापक मंडळाचे सभासद, भाऊबीज स्वंयसेवक, सेवकवर्ग, विदयार्थिनी उपस्थित होते. शासनाने कोविङ १९ च्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.