अहमदनगरः केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले, याविषयी जोरदार फटकेबाजी केली.

सहकार चळवळ मागे का पडली…

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, ‘ सहकार चळवळ मागे का पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास तुमच्या मदतीसाठी तयार आहे, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षण स्थगित झालेल्या ४१३ जागांसाठी आज मतदान

कुठे गेल्या महाराष्ट्रातील सहकारी बँका?

अमित शहा पुढे म्हणाले, ‘ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होतं. आज काय झालं कुठे गेल्या या बँका. घोटाळे का झाले. स्थिती काय आहे. केवळ तीनच उरल्या आहे. हजारो कोटीचे घोटाळे कसे झाले. हे काय रिझर्व्ह बँकेने केले का … नाही नाही… रिझर्व्ह बँकेने केले नाही. मी राजकीय भाष्य करायला आलो नाही. पण सहकारीता आंदोलनातील कार्यकर्त्यांना जरूर सांगेल सरकार तुमच्या सोबत आहे. मोदी तुमच्यासोबत आहे. सहकारीता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यावसायिकता आणली पाहिजे. मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना या आंदोलनात सहभागी करयाला पाहिजे. नव्या नेतृत्वाकडे त्याची धुरा दिली तर पुढील ५० वर्ष ही चळवळ टिकून राहील.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर - कामगार न्यायालय

प्रवरानगर ही सहकार क्षेत्राची काशी!

केंद्रीय सहकारी मंत्री यांनी प्रवरानगर येथील भूमीचे वर्णन करताना , ही भूमी सहकारीता क्षेत्रात काशी एवढीच पवित्र आहे, असे म्हटले. ते म्हणाले, ‘ त्याकाळात बाळासाहेब विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची चळवळ रोवली. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या भूमीत येऊन नतमस्तक व्हायला हवं. गुजरातमध्येही सहकार चळवळ सुरू झाली. अमूल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अमूलचा टर्न ओव्हर 50 हजार कोटींचा आहे.

महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यात चळवळ उभी केली. मोदींनी सहकारीतासाठी सहकार मंत्रालय तयार केलं. 75 वर्ष कुणालाही असं मंत्रालय करावं असं वाटलं नाही. सहकारीता आजही प्रासंगिक आहे. सबका साथ आणि सबका विकासचा मंत्र केवळ सहकारीतेतूनच होऊ शकतो हे माहीत आहे म्हणूनच मोदींनी हे मंत्रालय तयार केलं, असंही अमित शहा म्हणाले.