शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यातील वाद आज स्पष्टपणे उघड झाला आहे. कारण, रामदास कदम यांनी आज पत्रकारपरिषद घेत अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाय, अनिल परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसेनेचा मतदारसंघ ते राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत. गद्दार मी नाही तर शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. असं रामदास कदम यांनी जाहीरपणे विधान केलं. तर, रामदास कदम यांच्या या गंभीर आरोपावर मंत्री अनिल परब यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपावर बोलताना मंत्री अनिल परब यांनी, “मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. याबाबत नो कॉमेंट्स..” असं म्हणत, यावर फार भाष्य करण्याचे टाळले.

अधिक वाचा  तुमचा CIBIL Score चेक करा ऑनलाइन; जाणून घ्या

तर, रामदास कदम यांनी तुम्हाला गद्दार असं म्हंटल आहे, असं सांगत माध्यमांनी परब यांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा परब यांनी, “त्यांनी काही म्हणू दे. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्यावर त्याचं उत्तर मी देणार नाही. मी एक शिवसैनिक आहे ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबतची जी काही दखल घ्यायची आहे ती पक्ष घेईल.” अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली.

जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा अनिल परब कुठे होता? –

तर या अगोदर अनिल परबांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले होते की, “अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. शिवसेनेची नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. गद्दारांनी हाताशी घेऊन स्थानिक शिवसेनेच्या आमदारास बाजूला ठेवून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्यासाठी अनिल परब निघाला आहे, गद्दार तो आहे. घोषणा द्यायच्या असतील तर त्याच्याविरोधात द्या. तसेच, जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा अनिल परब कुठे होता?” असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला होता.

अधिक वाचा  विलक्षण प्रेमकहाणी 'पांघरुण' ट्रेलर प्रदर्शित