केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पहिले सहकारमंत्री अमित शहा यांनी अहमदनगरमध्ये बोलताना हील भूमी सहकार क्षेत्राची काशी असल्याचं सांगितलं. याच श्रेय त्यांनी विखे पाटलांना दिलं. छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि साई बाबांना वंदन करुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. अमित शहा यांनी सहकार क्षेत्रासाठी महाराष्ट्राने दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. अहमदनगर ही सहकार क्षेत्राची काशी सारखी पवित्र असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. सहकार क्षेत्राचा पाया रचण्याचं काम पद्मश्री विखे पाटलांनी केलं.मोठ्या अडचणींचा सामना करत त्यांनी ही काम केलं, त्यामुळे प्रत्येकांनं ही माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे असं ते म्हणाले.

अधिक वाचा  i phone SE 3 भारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होणार

सहकार आंदोलन अडचणीत असल्याचं अनेजण म्हणाले, त्यासाठीच हे खातं तयार केलं. ७५ वर्षात कोणीही याचा विचार केला नव्हता. मात्र नरेंद्र मोदींनी ते केलं असं अमित शहा म्हणाले. सहकार क्षेत्राची परिस्थिती अशी का झाली याचा विचार करायला हवा असंही ते म्हणाले. सुरुवातीला महाराष्ट्राच्या सहकारी बँकांची देशात चर्चा होती, मात्र नंतर त्यांची परिस्थिती काय झाली? त्यामध्ये घोटाळे कुणी केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, त्यांना मी उत्तर देऊ इच्छितो. देशातील ३१ टक्के साखरेचं उत्पादन सहकारी क्षेत्रातून होते. १३ टक्के गहू, २० टक्के तांदूळ, लिज्जत पापड, अमूल सारख्या अनेक सहकारी संस्था चांगलं काम करताय असं म्हणत त्यांनी या क्षेत्राचं महत्व सांगितलं.

अधिक वाचा  शाळेत पोर नाही...चक्क गुरुजींच भिडले; शिक्षकाचा अंगठा मुख्याध्यापकाने चावला

सहकार क्षेत्राच्या या आंदोलनाला आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो, त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्राला काहीही मदत लागली तर नरेंद्र मोदी सरकार ती मदत देईल असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच आता पर्यंत साखर उत्पादनासाठी सरकारने केलेल्या मदतीबद्दल देखील त्यांनी माहिती दिली आहे. तसेच येणाऱ्या काळात सरकार साखर कारखान्यांचे सर्व प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. गुजरातमध्ये अमुलच्या माध्यमातून ३६ लाख महिला आपला उदर्निवाह करत आहे, हा सुद्धा सहकाराचा परिणाम असल्याचं ते म्हणाले.