मुंबई : आणखी एक घोटाळ्याची बातमी हाती. गोरेगावच्या आरे कॉलनीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धान्याचा साठा करून काळाबाजारी करणाऱ्या गोदामावर छापा मारण्यात आला आहे. पोलिसांनी काळाबाजार करणाऱ्या 20 जणांना ताब्यात घेतले आहे. छाप्यात पोलिसांनी गहू, तांदळाचा मोठा साठा जप्त केला आहे.

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामध्ये आरे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असलेल्या रेशनिंगच्या दुकानात वाटल्या जाणाऱ्या गहू, तांदळाचा मोठा साठा करून काळाबाजारी करणाऱ्या गोदामावर छापा टाकला आहे. या कारवाईत 20 जणांना ताब्यात घेत, 5 ट्रकसोबत 25 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे गहू, तांदूळ जप्त केले आहेत.

अधिक वाचा  सहकार आयुक्तांची भाजपा सहकार आघाडी शिष्टमंडळाने घेतली भेट

पुढील कारवाई आरे पोलीस करत आहेत. यामध्ये काही अधिकारी देखील सहभागी असल्याचे बोलले जात असून, याचा पोलीस तपास करत आहेत.