आळंदी : श्री ज्ञानेश्वर स्थानिक सेवक पतसंस्थेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवडणूक उपनिबंधक कार्यालय खेड येथे सर्व संचालक मंडळाच्या सामंजस्याने झाली. यामध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपाध्यक्ष श्रीधर घुंडरे, खजिनदार बाळासाहेब भोसले, मानद सचिव मालनताई पाटोळे,तसेच संचालक श्रीरंग पवार,संगीता पाटील, अल्लाबक्ष मुलाणी,नारायण पिंगळे,दत्तात्रय वंजारी,कार्यलक्षी संचालक संजय उदमले,सल्लागार साहेबराव वाघुले,सेवक सावळाराम देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

त्यानिमित्ताने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सन्मान करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर,सचिव अजित वडगावकर,विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे,सदस्य अनिल वडगावकर,विद्यालयाचे उपप्राचार्य सिद्धनाथ चव्हाण,पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे,किसन राठोड,प्रशांत सोनवणे,अशोक बनकर, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  प्रसिद्ध कथक कलाकार पंडित बिरजू महाराज यांचे निधन