आज जागतिक चहा दिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्षाचे वतीने जागतिक चहा दिन वारजे उपनगरात साजरा करण्यात आला. संपुर्ण जगात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले जाणारे चहा हे पेय आज आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक पेय झाले आहे. मुळचे भारतातील नसलेले हे पेय चिनी लोकांनी जगभरात पोहचविले आणि या पेयाची ओळख भारतीयांना ब्रिटीशांनी करून दिली . १५ डिंसेबर २००७ पासुन जगभरात जागतिक चहा दिवस साजरा केला जात आहे .

हा चहा दिवस साजरा करण्यासाठी लेखिका सोनल गोडबोले , स्वीकृत सभासद संजय भोर , गुरुवर्य प्रकाश शिंदे , न्युजमेकर लाईव्हचे कार्यकारी संपादक माऊली म्हेत्रे ,साद प्रतिसादचे राजीव पाटील , दैनिक लोकमतचे सचिन सिंग , बजरंग लोहार, दैनिक पुढारीचे प्रदीप बलाढे, राष्ट्रवादीचे जावेद शेख, मराठवाडा सेवा संघाचे निळकंठ शेळके, वासुदेव समाज मंडळी, वारकरी संप्रदाय मंडळी, किरण साबळे यांचेसह अनेक जण उपस्थित होते .

अधिक वाचा  पुण्यात महसूल विभाग कोरोना काळातही मालामाल ; 21 हजार कोटींचा महसूल जमा

सर्वानी चहापान घेऊन चहा दिन साजरा केलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सचिन दशरथ दांगट, अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर यांनी केले होते.