एरंडवण्यातील जयदीप मंडळाच्या वतीने देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत व त्यांचे सहकारी यांच्या अकाली मृत्युबद्दल जयदीप मंडळाने आश्रुपुर्ती श्रद्धांजली व अभिवादन सभेचे आयोजन करून मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशातील संरक्षण व्यवस्था अध्यायावत व सक्षम करण्यासाठी आपल्या आयुष्याला अर्पण केलेल्या देशपुत्राबाबत मेघासिटीतील सर्व रहिवाशांनी शोक व्यक्त केला.

सैनिक कोणत्या पक्षाचा किंवा विचारसरणीचा कधीही नसतो त्याचं संपूर्ण आयुष्य हे फक्त आणि फक्त तिरंग्याचे अर्पित असतात हा असा देश पुत्र होता की ज्याच्या नसानसात फक्त आणि फक्त देशसेवाच होती. सध्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणाऱ्या अंधभक्तांना याची जाणीव होणार नाही पण रावत यांचे कार्य स्वातंत्र्यकार्याला अर्पित केलेल्या देशभक्तांच्या तोडीचं होतं असे वक्तव्य ज्येष्ठ पदाधिकारी उत्सव प्रमुख संदीप मोकाटे यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  नागराज मंजुळें नव्या लूकमध्ये ; ओळखणंही झाले कठीण

सदर प्रसंगी संदीप मोकाटे, हरिकिशन राठी, सुरज पवार, आकाश माने, मनोज पवार, समीर चव्हाण, प्रविण माने , नितीन शेटे , प्रसाद राठी,जतीन बनकर, वृषभ मोकाटे,सुनिल शिदे सचिन पवार रुपेश धोत्रे सोमनाथ मोहिते यांच्यासह जयदीप मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.