महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. स्वप्निलची आत्महत्त्या मुलाखत होत नसल्याच्या प्रश्नाबाबत चर्चेचं कारण ठरली होती.. स्वप्नील एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, करोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले होतं. मात्र  आती जी मुलाखत दीड वर्षापासून झालेली नव्हती, त्याच मुलाखतीच्या यादीमध्ये आता स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे.

अधिक वाचा  भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा तर्फे नाना पटोले यांना जोडेमारो आंदोलन

मुलाखत रखडल्याने स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली होती. आता मृत्यूनंतर एमपीएसीने मुलाखती यादी जाहीर केली असून या यादीत स्वप्नील लोणकरचं नाव आहे. सात जानेवारीला एमपीएसी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याचं नाव यादीत वगळण्यात आलेलं नाही. यानिमित्ताने एमपीएसीचाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. यावरुन आता विरोधकांकडूनही सरकावर टीका करण्यात येत आहे.

सरकारला कसलीच लाज उरली नाहीये, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांनी ट्विटरवर यासंदर्भातील बातमीची फोटो पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. “आधी उत्तीर्ण होऊन दिड वर्ष झाली तरी मुलाखतीला बोलवलं नाही. म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं आता आत्महत्येचीही क्रूर थट्टा करतायेत. प्रस्थापितांच्या सरकारला कसलीच लाज उरली नाहीये. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या या गिधाडी प्रवृत्तीचा धिक्कार असो,” असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांना परम विशिष्ट सेवा पदक; शौर्य पुरस्कार ३८४ जणांनाजाहीर

स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलेलं पुणे शनिवारी हादरलं! पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.