नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजप गेलेले उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी काल भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

उदयनराजे आणि शरद पवारांमध्ये केवळ सदिच्छा भेट?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार दिल्लीत आहेत. याच दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. नुकत्याच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिक वाचा  Bluetooth Neckband लाँच 8 मिनिटांच्या चार्जिंगवर 8 तास चालते

असं म्हटलं जात आहे की, ही एक सदिच्छा भेट होती. नुकताच शरद पवारांचा वाढदिवस झाला आणि त्यावेळी शरद पवारांची भेट घेणं शक्य नाही झाले त्यामुळे आता उदयनराजेंनी दिल्लीत पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून ही एक सदिच्छा भेटच होती असं उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

शिवसेना यूपीएत सहभागी होणार?

शिवसेना यूपीएत (UPA) सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, आगामी काळात पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत. काल सोनिया गांधी यांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत शरद पवार, फारुक अब्दुल्ला, सिताराम येचुरी, शिवसेनेकडून मी उपस्थित होतो. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीच्या संदर्भात फोन केला होता. त्यानंतर उद्धवजींनी मला बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. या बैठकीत अनेक सकारात्मक चर्चा झाल्या. पुन्हा बैठक घ्यावी अशी सूचना शरद पवारांनी केली.

अधिक वाचा  गांधी हत्येचे समर्थन कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही करु शकत नाही', आव्हाडांचा रोखठोक टोला

शिवसेना यूपीएचा भाग झाली आहे का? यावर संजय राऊत म्हणाले, तुमच्याकडे तशी माहिती आली आहे का? आम्ही यूपीएचा भाग अद्याप झालेलो नाहीयेत. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करत आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊन सत्ता लचालवत आहेत मला असं वाटतं की हा मिनी यूपीएचा प्रयोग आहे. महाविकास आघाडी हे राज्यस्तरावरचं एक मिनी यूपीए आहे.