भुसारी कॉलनीमध्ये नविन सोसायटीचे काम चालू असून त्यांनी प्लॉट मधील पाणी मोकाटे टॉवर्स जवळील पावसाळी लाईनमध्ये सोडले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेला पाईप धोकादायकरित्या रस्त्यावरून टाकला आहे. यावरून महिलांना, दुचाकी चालवताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महिला रात्रीच्या वेळी गाडी चालवीताना पाईपवरून पडल्या आहे. किरकोळ स्वरूपात दुखापत झाली असून भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता असुन भविष्यात अपघात होऊ नये म्हणुन तो धोकादायक पाईप काढून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा उपविभाग प्रमुख रमेश उभे यांनी दिला आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचार सहन करणार नाही : चित्रा वाघ