मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. वन-डे टीमच्या कॅप्टनपदी विराट कोहलीला हटवून रोहित शर्माला कॅप्टन करण्यात आले. या निर्णयावर विराट नाराज असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर तो दक्षिण आफ्रिका विरुद्धची वन-डे मालिका खेळणार नाही, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कारणांमुळे भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. फॅन्सचा हा गोंधळ आज (बुधवार) दूर होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेटमधील या गोंधळाचा केंद्रबिंदू असलेला विराट या सर्व प्रश्नांवर अखेर मौन सोडण्याची शक्यता आहे. टीम इंडिया गुरूवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यापूर्वी विराट कोहली मुंबईत आज (बुधवार) मीडियाला सामोरं जाणार असून त्यावेळी तो त्याच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  डिसले गुरुजींचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा; शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असलेला विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन-डे सीरिज खेळणार नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. विराटला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ हवा आहे. वामिकाचा पहिला वाढदिवस 11 जानेवारी रोजी आहे. विराट टेस्ट सीरिजनंतर वामिकाचा वाढदिवस साजरी करण्यासाठी सुट्टीचं नियोजन करत आहे, असे वृत्त आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन-डे सीरिज 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या काळात विराट सुट्टीवर असेल, अशी चर्चा आहे. विराटने मात्र अद्याप या विषयावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

अधिक वाचा  रवी शास्त्री यांचे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या बचावात मोठे विधान

टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या प्रश्नावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले होते. आपण विराटला टी20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस, अशी विनंती केली होती, असे स्पष्टीकरण गांगुली यांनी दिले होते. विराट या विषयावर देखील उत्तर देण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि बीसीसीआय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील संबंध सध्या कसे आहेत यावर विराटकडून उत्तरं मिळतील, अशी फॅन्सना आशा आहे.