१ जानेवारी भिमा कोरेगांव विजयी रणस्तंभ शौर्य दिनानिमित्त आज संयोजन समितीच्या वतीने नियोजनाबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भिमा कोरेगांव रणस्तंभ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, राष्ट्रवादीचे नेते व आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजयबापु डाकले, दलित पॅंथर अॅाफ ईंडियाचे शहराध्यक्ष सुखदेव सोनावणे, दलीत पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्ती चे भारताचे राजदूत बापुसाहेब भोसले, आरपीआय युवक आघाडीचे राज्याध्यक्ष निलेशराव आल्हाट, भिम आर्मीचे शहरप्रमुख दत्ताजी पोळ, राष्ट्रवादीचे युवा नेते साकी गायकवाड व कामगार आघाडी प्रमुख विशाखाताई गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांताताई कांबळे यांच्यासह विविध पक्ष व चळवळीतील ६० पेक्षा जास्त संघटना/ संस्थांचे प्रमुख हजर होते.

अधिक वाचा  ‘पुष्पा’ सिनेमातल्या शेषाचलम जंगलाबद्दल थक्क करणाऱ्या गोष्टी…

विजयबापु डाकले यांनी बोलताना १ जानेवारी निमित्त संयोजन समितीच्या वतीने राबवण्यात येणारे ऊपक्रम, शासनाने रणस्तंभ परिसर विकसनासाठी तरतुद केलेल्या १०३ कोटी रुपयांच्या निधीबाबतची माहिती, प्रशासन, पोलिस, संघटना यांची संयुक्त बैठक याबाबत सविस्तर माहिती दिली.