साहेब…… या शब्दाचा उच्चार केला की जशी ऊर्जा आणि अखंड तेवत राहणारे सामर्थ्य मिळते तशीच सामाजिक जाणिवही. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना  राहणीमान साधं असले तरी वैचारिक उंची आणि जनतेच्या कामाची बांधिलकी कायम ठेवा हा संदेश आज आमच्या जीवनाचे ब्रीद वाक्य आणि याच विचारांला अर्पित केलेली ही आमची आजवरची जनसेवा ही पवार साहेबांच्या विचारांचीच देणगी आहे. आज माझे दैवत पवार साहेब ८१व्या वर्षांमध्ये पदार्पण करत आहेत याचा सार्थ अभिमान आहेच पण साहेबांचे विचार श्वास आणि ध्यास चिरंतर राहणारच…!

महिलांची प्रतिष्ठा अन् सन्मान

पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ता नसली तरीही एक सामाजिक जाणीव अन विचाराची बांधिलकी यातून एक महिला चेहरा ही एक भक्कम विरोधकाचे काम करू शकतो. महिलांची प्रतिष्ठा आणि महिला सबलीकरण ही भावना जनसामान्यात पुणे शहरात रुजवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांचे विचाराने पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारली.

अधिक वाचा  बाणेर येथून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला

आदरणीय पवार साहेबांच्या या विचाराला न्याय देण्यासाठी दोन वर्षापासून पुणे महानगरपालिकेमध्ये या पदावर काम करण्याची संधी मिळत असली तरीही राहणीमानातील साधेपणा आणि वैचारिक उंची या विचाराबरोबर जनसामान्यांशी कायम बांधिलकी जपत विरोधी पक्षनेता हा सर्वसामान्य पुणेकरांचा हक्काचा आधार म्हणून गेली दोन वर्ष अहोरात्र काम करण्याची संधी देणारे पवार साहेब आज जरी 81 वर्षाचे झाले असले तरी हे पितृतुल्य व्यक्तिमत्व आम्हाला आजही समवयस्क वाटतं…. हीच साहेबांची ताकद आहे.

उतुंगता व्यक्तिमत्वाची….

महाराष्ट्रातील राजकारणाचा सह्याद्री…. हे कायमच पवार साहेबांच्या बाबतीत बोललं जात असलं तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व हे याची पदोपदी प्रचिती देत असत की त्यांच्या  हृदयामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ची संवेदना दडली आहे.

अधिक वाचा  वैवाहिक बलात्काराच्या वेदना दुर्लक्षितच; पतीचा जबरदस्तीचा संबंध वैधच

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा क्षेत्रात केलेले पवार साहेबांचे कार्य म्हणजे हा महाराष्ट्रातील सह्याद्रीच आहे.. याची जाणीव सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कायम होत राहते. त्यांचे विचार आणि सहवास ही पर्वणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी एक केंद्र बनले असून या ऊर्जाकेंद्राने शतायुषी होऊन महाराष्ट्राला कायम प्रेरणा द्यावी हीच इच्छा.

महिलांचा सामाजिक निर्णयप्रक्रियेत सहभाग

महिलांनाही सामाजिक विकासाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यावेपासून यासाठी साहेबानी १९९३ साली महिलाना ३३ टक्के आरक्षण दिले. तर २०११ मध्ये हेच आरक्षणा ५० टक्के करून आदरणीय पवार साहेबांनी संपूर्ण जगाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यामुळेच चुल आणि मुल वा जाळ्यातून बाहेर येऊन खेडोपाळ्याताल महिलाही गावच्या निर्णय प्रक्रियेत उतरली आहे. साहेबांबरोबर काम करत असताना त्यांचे कार्य कर्तृत्व व व्यक्तिमत्त्व यांचा जवळून अनुभव आला कोठून येत असल एवढी उर्जा….! त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर लोक माझे सांगाती हेच खरे सांगता येईल. त्यामुळेच आज नवयुवकांना ते फुले-शाहू आंबेडकर ही विचारधारा समजून सांगतात, जर युवकांच्या मेळाव्यात युक्तींनाही प्राधान्य द्या असा सल्ला ते आपल्या युवा कार्यकर्त्याला देतात.

अधिक वाचा  राष्ट्रवादीची कर्जतवर एकहाती सत्ता; राम शिंदेंना कात्रजचा घाट

सर्वसमावेशक व्यक्तिमत्व

आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबर गेली पंचवीस वर्ष सामाजिक शेतात काम करत असताना आज वर जे पाहिलं त्यामध्ये एकच जिकला दिसलं की पवार साहेब हे फक्त राजकारणासाठी न जगणारे अद्भुत रसायन आहे. सर्वपक्षीय मैत्री सर्वस्तरातील संबंध उद्योजक, वंचित, कष्टकरी, विद्यार्थी आणि शेतकरी या सर्वांना जिव्हाळ्याचं आपुलकीचं आणि हक्काचं एकमेव ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आणि फक्त शरद पवार साहेब आहेत.

वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!