कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन- २०२२” अन्वये प्रभाग क्रमांक १०, ११, १२ या तीनही प्रभागात “पथ दिन” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम श्रीकांत ठाकरे पथ विशेषतः आशिष गार्डन चौक ते गोपीनाथ नगर पर्यंत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पदपथावर रंगरंगोटी करून शिवाय शोभेची झाडे लावून, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, दोन्ही बाजूचे रस्त्यावर येणारे वृक्ष छाटणी करणे, डिव्हायडर च्या आतील शोभेच्या वृक्षाची छाटणी आकर्षकरित्या करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा लाईटची व्यवस्था करण्यात आली. तसेच तीनही प्रभागातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग हे देखील जेटिंग मशीन लावून स्वच्छ करण्यात आली तसेच आतील बाजूस आकर्षक दिवे बसविण्यात आले शिवाय स्वच्छतेचे संदेश देखील लिहिण्यात आले. विशेषतः डहाणूकर कॉलनी भुयारी मार्ग समोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली व नागरिकांना पथ दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा  विद्यापीठ आणि महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

पदपथावर चालत असताना नागरिकांना निसर्गरम्य वातावरणाची चाहूल लागावी अशा प्रकारची सार्वजनिक स्वच्छता आरोग्य विभागाच्या वतीने अतिशय चोखपणे करण्यात आली. पथ विभागाच्या वतीने रस्त्यावरील व पद पाथवरील खड्डे डांबर टाकून बुजवण्यात आले. सदर श्रीकांत ठाकरे पथावरील अतिक्रमण भाजीवाले, पथारीवाले, हातगाडीवाले यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला. अशाप्रकारे सुशोभीकरण केलेल्या पदपथावरून चालताना ज्येष्ठ नागरिक नागरिक अतिशय उत्सहाने चालत होती व आपला आनंद एकमेकांना शेअर करत होती. तसेच असाच रस्ता रोजच्या रोज स्वच्छ अतिक्रमणमुक्त, निसर्गरम्य वातावरण, मोकळा श्वास घेण्यासाठी आम्हाला असाच पदपथ असावा अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केल्या. सदर पथ दिनाचा कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.

अधिक वाचा  स्वखर्चाने तरुणाचे 65 लाखाचे समाजकार्य; २० वर्षांपूर्वीचा गोकुळनगर पठार रस्ता मार्गी..

सदरकार्यक्रमास सन्माननीय नगरसेवक दिलीप वेडेपाटील, मा. नगरसेविका मा. सौ. हर्षाली माथवड, सौ. वासंती ताई जाधव, सौ. श्रद्धा ताई प्रभुणे, सौ. अल्पना ताई वरपे, किरण दगडे पाटील, स्विकृत सदस्य मा. बाळासाहेब टेमकर, जनसेवक नवनाथ जाधव, दिनेश माथवड व कोथरूड भागातील जेष्ठ नागरिक पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले.

पथ दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी “नागरिकांना स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पुणे शहराला नंबर एक करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आपला देश आपले पुणे शहर स्वच्छ ठेवू या असे आव्हान करण्यात आले.” रस्त्याची स्वच्छता व महानगरपालिकेने पुरविलेल्या नागरी सुविधा टिकविण्याची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी तसेच आपले पुणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया अशी साद घालण्यात आली.

अधिक वाचा  सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी

सदर कार्यक्रम आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे, सचिन लोहोकरे, करण कुंभार, शिवाजी गायकवाड, प्रमोद चव्हाण, हनुमंत चाकणकर, रूपाली शेडगे, संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, गणेश साठे, अभियंता अनंता ठोक मुकादम साईनाथ तेलगी, संजय कांबळे, अण्णा ढावरे, वैजीनाथ गायकवाड, नितीन भगत, अशोक कांबळे, विजय पाटील तसेच सर्व सफाई कर्मचारी यांनी अहोरात्र प्रत्यक्ष काम करून ठाकरे पथ सजवण्यात आला.