आज पुणे महानगरपालिका व मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक माध्यमातून पुणे शहरात पदपथावर “इव्हेंट” करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्ताधारी भाजप पक्षाची पोलखोल करण्यासाठी व सत्य परिस्थिती पुणेकरांना दाखवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदार संघ यांनी रस्त्यावर उतरून भारतीय जनता पक्षाच्या या ढोंगी इव्हेंटची पोलखोल केली.

सुज्ञ पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला पुणे शहरातील रस्ता हा आपल्या जाहगीरदारी असल्याच्या अविर्भावात सध्या सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वावरत असून त्यावर अतिक्रमणे, घाण आणि उरलेल्या जागेवर ह्यांची वाचनालय थाटली आहेत. फक्त चकचकीत रस्त्यांवर नावाला इव्हेंट करायचं व प्रभागात नागरिकांना चांगले पदपथ नाही देऊ शकत हे झाकून ठेवायचे हे सिद्ध होते.” मनसे चा विकासाला कधीच विरोध नव्हता पण खोटे इव्हेंट करणाऱ्यांना आम्ही जनते समोर नक्की उघडे पाडू.” असे ह्यावेळी मनसे खडकवासला विभागातील पुणे उप शहरअध्यक्ष कैलास दांगट  म्हणाले.

अधिक वाचा  एका आयटम नंबरसाठी तब्बल एवढे मानधन घेतात या अभिनेत्री

निवडणुक जवळ आली म्हणुन पुणेकरांची पादचारी दिन साजरा करुन फसवणुक होतेय का? गेली पाच वर्षापासुन बंद असलेला कर्वेनगर आणि गांधी भवन येथील भुयारी मार्ग पादचारी दिन म्हणुन साफसफाई करुन चालु केला. गेली कित्येक वर्ष मृत्युंजय मंदीर आणि कोथरुड अग्निशामक केंद्र येथील पादचारी उड्डान पुलावरुन रस्ता ओलांडताना एकही पादचारी दिसला नाही. फक्त बाणेर बालेवाडी आणि लक्ष्मीरोड म्हणजे संपूर्ण पुणे नाही. निवडणुका आल्या म्हणुन गेली दहा दिवसांपासुन रोडवरील पांढरे पट्टे झेब्रा क्राँसिंग याची रंगरंगोटी चालु आहे. संपूर्ण पुण्यातील सगळे फुटपाथ अतिक्रमण करुन वेढले गेलेत. जेष्ठ नागरिकांना सहज सुरक्षित रस्ता ओलांडता येईल अशी परिस्थिती पुण्यात कोठेच दिसत नाही. यामुळे रोज अनेक अपघात होतात त्यामुळे मतदार राजा जागा हो नवनिर्माणाचा धागा हो अशी आर्त हाक देत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारजे खडकवासला मतदार संघ च्या वतीने मतदार जनजागृती करण्यासाठी व भारतीय जनता पार्टीच्या पोलखोलीसाठी रस्त्यालगत घोषणा करण्यात आली.