आज पुणे महानगरपालिका व मा.महापौर यांच्या माध्यमातून पुणे शहरात पदपथावर “इव्हेंट” करण्यात आला. ज्याची पोलखोल करण्यासाठी व सत्य परिस्थिती पुणेकरांना दाखवण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरली.

मनसेने कोथरूड मध्ये प्रभाग क्रमांक १२ मध्ये पोलखोल केली. यामध्ये महापौरांच्या प्रभागातच पदपथ गायब आहेत, आहेत तर त्यावर अतिक्रमणे, घाण आणि उरलेल्या जागेवर ह्यांची वाचनालय थाटून ठेवली आहेत. म्हणजे फक्त चकचकीत रस्त्यांवर नावाला इव्हेंट करायचं व स्वतःच्या प्रभागात नागरिकांना चांगले पदपथ नाही देऊ शकत हे झाकून ठेवायचे हे सिद्ध होते.

कोथरूड भागामध्ये भाजपाला बहुमत असल्यामुळे कोणत्याही कामाला विरोध केला की विकासाला विरोध असा सूर कायमच या भागातील नगरसेवक आवळत असतात. “मनसे चा विकासाला कधीच विरोध नव्हता पण खोटे इव्हेंट करणाऱ्यांना आम्ही जनते समोर नक्की उघडे पाडू.” असे ह्यावेळी मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे म्हणाले.

अधिक वाचा  शिवसेना 50 जागा लढवणार, UPमध्ये परिवर्तन निश्चित; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

आजच्या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, शहर संघटक शैलेश जोशी, रमेश परदेशी, राजेंद्र वेडेपाटील, हर्षद खडे, संजय काळे, किरण उभे, विराज डाकवे, गणेश शिंदे, अशोक कदम, सचिन विप्र, बाळा शिंदे, शाम बोऱ्हाडे, मयूर सुतार, अशोक दळवी व मनसे कोथरूड चे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.