छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण मालिकेतील ‘दया दरवाजा तोडदे’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याचे दिसत आहे. पण हा डायलॉग कसा सुचला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण जाणून घेणार त्या डायलॉग मागचा किस्सा.

CID मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीचा आज वाढदिवस आहे. त्याने स्वत: एका मुलाखतीमध्ये मालिकेतील दरवाजा तोडण्याची कल्पना कुठून आली हे सांगितले होते. CID ची संपूर्ण टीम आरोपीला पकडत असताना अशा परिस्थितीमध्ये अडकायची की तेथे दरवाजा तोडावाच लागायचा. अशा वेळी एसीपी प्रद्युमन त्यांच्या टीममधील दयाला ‘दया दरवाजा तोड़ दो’ असे सांगायचे. लगेच दया एकच लाथ मारुन दरवाजा तोडायचा.

अधिक वाचा  शिवसेना 50 जागा लढवणार, UPमध्ये परिवर्तन निश्चित; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

दयाला एका मुलाखतीमध्ये त्याने संपूर्ण मालिकेत किती दरवाजे तोडले आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने ‘याचा मी कोणता रोकॉर्ड ठेवलेला नाही. पण इतकं नक्की याचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झाला असता. मी १९९८ पासून दरवाजा तोडत आहे. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा एका भागात गेट बंद असल्यामुळे दरवाजा तोडण्यास मला सांगण्यात आले होते. पण ही गोष्ट प्रेक्षकांना जास्त आवडली. माझं बघून अनेकांनी दरवाजा तोडायला सुरुवात केली. फ्रेडीने पण दरवाजा तोडला होता. पण लोकांना दयाने दरवाजा तोडणे सर्वात जास्त आवडले’ असे दयाने सांगितले. लोकांना मी दरवाजा तोडतानाचा सीन आवडू लागला. त्यानंतर आम्ही ते चालवू लागलो. तो एक ट्रेडमार्क बनला आणि दरवाजे तूटत गेले.