कोणत्याही जोडप्याच्या मजबूत नातेसंबंधात लैंगिक जीवन महत्त्वाची भूमिका बजावत असते. सामान्यतः, लोकांची लैंगिक धारणा या चित्रपट किंवा मालिकांमधून खूप प्रेरित असतात. चांगले लैंगिक संबंध म्हणजे फक्त फिजिकल रिलेशनशिप यापुरतेच मर्यादित असते. परंतु, एका नवीन संशोधनानुसार, इंटीमसी ही अशी स्थिती आहे जी शरीरापेक्षा मानसिकतेशी अधिक संबंधित आहे. कॅनडातील ओटावा विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट पेगी जे. क्लेनप्लॅट्झ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हा अभ्यास केला आहे. डॉक्टर पेगी हे प्रसिद्ध पुस्तक मॅग्निफिसेंट सेक्सचे लेखक देखील आहेत. संशोधकांच्या मते, सेक्स हा स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला जवळून ओळखण्याचा एक मार्ग आहे. अभ्यासात संशोधकांनी सेक्स लाईफ सुधारण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

अधिक वाचा  अल्लू अर्जुनच्या ‘त्या’ दृश्यांवरून ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!

जोडीदारासोबत राहा- संशोधकांचे म्हणणे आहे की, आजच्या काळात लोकांना सोशल मीडिया जास्त जवळचा असतो. काही लोक पार्टनरच्या सोबत असले तरीही ते कायम मोबाइल तपासात राहतात. म्हणजे ते शारीरिकदृष्ट्या जोडीदारासोबत असतात पण त्यांचे मन दुसरीकडेच असते. शारिरीक संबंध ठेवताना जोडीदारासोबत पूर्ण सहभाग असणे आवश्यक असते.

लैंगिकतेची व्याख्या विस्तृत करा– संशोधकांचे म्हणणे आहे की, लैंगिकतेबद्दल लोकांची सामान्यतः परंपरागत विचारसरणी असते. जोडीदारासोबत हे करायचं आणि हे नाही, हाच पॅटर्न अनेक लोकांचं सेक्स लाईफ फॉलो करतात. लोक शारीरिक जवळीक म्हणजे थेट संभोग समजतात. परंतु याशिवाय अनेक गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. जोडीदाराचे चुंबन (Kiss) घेणे, फोरप्ले, सेक्स टॉक आणि स्पर्श करणे यासारख्या गोष्टी देखील महत्वाच्या असतात. या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कसे पुढे जायचे हे समजण्यास मदत करते. संशोधकांचे म्हणणे आहे की लोकांनी त्यांच्या लैंगिक कल्पनांना देखील ओळखले पाहिजे.

अधिक वाचा  नाना पटोलेंचे मानसिक संतुलन हरपले, वेड्यांच्या इस्पितळात भरती करा- चंद्रशेखर बावनकुळे

स्वतःच्या लैंगिक इच्छेबद्दल जाणून घ्या- अनेकांना लैंगिक कल्पनांबद्दल भीती असते की त्यांचा जोडीदार त्यांना चुकीचा समजेल किंवा त्यांची इच्छा नाकारेल. संशोधकांच्या मते, जर तुम्हाला सेक्सची बद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर, तर तुम्हाला तुम्हाला काय हवे आहे हे जाणून घ्यावे लागेल. तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दल माहित करून घ्यावे लागेल. तुमच्या कल्पना कशाही असल्या तरी त्या स्वीकारायला शिका. जर तुमचा तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही अजिबात संकोच न करता तुमच्या कल्पना त्यांच्यासोबत शेअर करू शकता.

सुरुवातीपासूनच सेक्स विषयी बोलत राहा- नात्याच्या सुरुवातीपासूनच सेक्सबद्दल मोकळेपणाने बोलणे ठेवा. एकमेकांशी प्रतिक्रिया शेअर करणे, चांगल्या वाईट गोष्टी सांगत चला. तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या पार्टनरकडून काय अपेक्षित आहे हे याबद्दल स्पष्टता देते. सेक्सला गांभीर्याने घेण्याऐवजी, त्याला थोडी मजा म्हणून घ्या आणि परंतु इतर सर्व गोष्टींप्रमाणे त्याला प्राधान्य द्या.