पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आपल्याला अशी मानसिकता ठेवावी लागेल, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रश्न तूर्तास मिटलाय, पण शिवसेनेची इथं आपल्यासोबत आघाडी करायची तयारी दिसते. दोन पावलं ते मागे आले तर आपणही तशी भूमिका घेऊ.”

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेचा धागा पकडत अजित पवार म्हणाले, “काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनीच आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय, कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत.”

अधिक वाचा  ३९४६ युवकांना ३१३ कोटी रुपयांचे कर्ज! पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा सर्वोत्तम

एकूणच महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतले प्रमुख पक्षही विविध ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढण्याचे चित्र दिसू शकतं, हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे.