मुंबई : कर्मचाऱ्यांसाठी पीएफ रक्कम ही अतिशय महत्त्वाची असते. अनेक पीएफधारक हे पीएफ खात्यातील रक्कमेचा वापर हा महत्त्वाच्या कामासाठी करतात. पीएफही वेळोवेळी पीएफधारकांसाठी योजना आणत असते. पीएफने अशीच एक योजना आणली आहे, ज्याद्वारे पीएफधारकाला एक रुपयाही न गुंतवता तब्बल 7 लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ हा केवळ सरकारी कर्मचारी नाही, तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही घेता येणार आहे. ही योजना नक्की काय आहे, याचा लाभ कोणाला घेता येणार, याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (epfo employees deposit linked insurance scheme benefits of 7 lakhs ruppes without any payment know details)

अधिक वाचा  राष्ट्रवादीची कर्जतवर एकहाती सत्ता; राम शिंदेंना कात्रजचा घाट

पीएफकडून पीएफ आणि निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त अनेक फायदे मिळतात. पण त्याबाबत आपल्याला माहिती नसते. पीएफकडून पीएफधारकांना जीवन विम्याचा लाभ देते. यानुसार पीएफधारकाला 7 लाख रुपयांचा लाभ मिळतो. यासाठी पीएफधारकाला एक रुपयाही गुंतवण्याची गरज नाही. इपीएफओने या विशेष योजनेची माहिती ट्विट करत दिली आहे.

पीएफधारकांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत पीएफच्या सर्व खात्यांवर मोफत विमा म्हणून 7 लाख रुपयांचा लाभ मिळतो.