माननीय सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त कोथरूड काँग्रेस, राजीव गांधी पंचायत राज संगठन ह्यांच्या वतीने व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज ह्यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू लेन्स व मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप, बी पी शुगर तपासणी असे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरास लोकमान्य वसाहत, शास्त्रीनगर , कोथरूड पौड रोड या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.213 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अभय छाजेड , कोथरूड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विजय खळदकर, कोथरूड महिला अध्यक्ष मनिषताई करपे, युवराज मदगे, बालाजी शिंदे, रंजना पवार, रेशमा सुतार, शेख भाभी, गणेश गायकवाड, विश्वास खवळे, बंटी जाधव, विजय मोहोळ तसेच युवा उद्योजक किरण मारणे इ. उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर सरचिटणीस व राजीव गांधी पंचायत राज संगठन अध्यक्ष मा. श्री किशोर मारणे व सुरेखा मारणे ह्यांनी केले.