मयूर गणेश कोंडे-देशमुख यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित महिलेने जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. सदर आरोपी व पीडित बारामती येथे राहावयास असून एकमेकांना मागील ४ वर्षांपासून ओळखत होते व त्याच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. दरम्यानच्या काळात आरोपी याने पीडितेबरोबर मातोश्री लॉज, मोरगाव रोड, पुरंदर येथे अनेकवेळा लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपी व पीडित यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत पीडितेच्या कुटुंबियांना कळाले व पीडितेने आरोपीशी लग्न करणार असल्याचे घरी सांगितले. परंतु आरोपी याने पीडितेबरोबर लग्न करण्यास नकार दिला व मोबाईल फोन बंद केला. तसेच पीडित महिला ह्या मातंग समाजाच्या आहेत हे माहीत असूनही आरोपी याने लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचे आरोप फिर्यादी जवाबात पीडितेने केले आहेत.

अधिक वाचा  अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीच्या जागावाटपावर मोठं वक्तव्य

आरोपी यास दिनांक ०९/१०/२०२१ रोजी जेजुरी पोलिसांनी अटक केली होती. विशेष सत्र न्यायाधीश मा. सौ. एस. व्ही. सहारे यांनी आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपी व पीडित यांच्यातील संबंध सहमतीने प्रस्थापित झाले होते व पीडितेस त्याबाबतचे परिणाम माहीत होते त्यामुळे प्रथम दर्शनी बलात्काराचा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा प्रथम दर्शनी दिसत नसल्याचे मा. न्यायालयाने जामीन देताना आदेशात नमूद केले आहे. आरोपितर्फे न्यायालयात ॲड.मयूर दोडके व ॲड.लहु माने, ॲड. समीर जोरी यांनी बाजू मांडली व पीडित महिला ह्या २६ वर्षाच्या उच्चशिक्षित असून फक्त लग्नास नकार देणे भा. द. वि. कलम ३७६ च्या संज्ञेत येत नाही असा युक्तिवाद ॲड. दोडके यांनी केला होता.