मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ अखेर लग्नबंधनात अडकले. विकीच्या नजरेत कायमच कतरिनाकरता खास चमक दिसली. आज लाखो हृदयांची धडकन असलेली कतरिना अखेर विकी कौशलची झाली. विकी- कतरिनाच्या लग्नाची चर्चा खूप झाली. पण सोहळ्याचा एकही फोटो समोर आला नव्हती.

सात फेरे घेऊन विकी कतरिना आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले. यानंतर विकी- कतरिनाचा लग्नाच्या पेहरावातील पहिला फोटो समोर आला. विकी – कतरिनाच्या लग्नाचे चार फोटो समोर आले आहेत. या फोटोंत दोघांमधील प्रेम अतिशय खुलून दिसत आहे.

विकीची नजर आणि कतरिनाच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांचा आनंदाचं प्रतिक आहे. विकी – कतरिना अतिशय सुंदर दिसत आहे. अगदी नजर लागू नये असा हा चोडा चाहत्यांसाठी खास आहे.

अधिक वाचा  एका आयटम नंबरसाठी तब्बल एवढे मानधन घेतात या अभिनेत्री

या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.

विकीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला.