नवी दिल्ली : प्रथिने आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. प्रथिने स्नायूंचा विकास करण्यास मदत करतात तसेच केस आणि नखांच्या मजबुतीसाठी देखील आवश्यक आहेत. अनेकांचा असा समज असतो की, प्रथिने फक्त अंड्यातून मिळू शकतात. पण असे नाही, काही शाकाहारी पदार्थ अंड्यापेक्षा जास्त प्रथिने देतात. चला तर मग जाणून घेऊया अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने देणाऱ्या शाकाहारी पदार्थांविषयी.

अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने देणारे शाकाहारी पदार्थ WebMD ने दिलेल्या माहितीनुसार, खालील शाकाहारी पदार्थ अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने आपल्या शरीराला देऊ शकतात.

1. हरभरा

अर्धा कप हरभरा खाल्ल्याने अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने मिळतात. भारतात हरभरा करी किंवा हरभरा चाट खाणे लोकांना खूप आवडते. प्राचीन काळापासून विशेषत: इजिप्तमधील लोक शरीरात प्रथिने मिळविण्यासाठी हरभरा खात आहेत.

अधिक वाचा  महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरून वाद ; महिला आयोगाने मागितले स्पष्टीकरण

2. बदाम बटर

पीनट बटर व्यतिरिक्त बदाम बटर देखील प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. सुमारे 2 चमचे बदाम बटर खाल्ल्याने सुमारे 7 ग्रॅम प्रथिने मिळतात. बदाम बटरचे सेवन सॅलड, टोस्ट इत्यादीसोबत करू शकता.

3. कडधान्ये

मांसाहारी अन्नापेक्षा शाकाहारी अन्नामध्ये प्रथिने कमी आहेत असे समजू नये. अर्धा कप मसूर खाल्ल्यास सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसूर शिजवणे खूप सोपे आहे आणि विविध प्रकारे त्याचा उपयोग करता येतो.

4. सूर्यफूल बिया

प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये सूर्यफुलाच्या बियांचाही समावेश होतो. प्रथिनांसह सूर्यफुलाच्या बिया लोह, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सेलेनियम सारखे आवश्यक पोषक घटकही मिळतात. 28 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यास सुमारे 8 ग्रॅम प्रथिने मिळतात.

अधिक वाचा  रिलेशनशिप मंत्र: ‘या’ सवयींमुळे महिला ‘अनकम्फर्टेबल’ पुरुषांनो वेळीच बदला!

5. क्विनोआ

क्विनोआ हे पूर्ण धान्य मानले जाते, तो प्रथिने आणि फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे शाकाहारी अन्न अतिशय आरोग्यदायी आहे, यातून अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने मिळतात. एक कप क्विनोआ खाल्ल्याने सुमारे ७ ग्रॅम प्रथिने मिळतात. जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे.

(सूचना : या लेखातली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे)