सातारा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फलटण येथे झालेल्या कार्यक्रमात टिका केली होती. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर घराच्या बाहेर पडावं लागतं असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं हाेते. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दादांच्या त्या वक्तव्यावर शिवसेना गावा गावांत त्याचा समाजार घेईल असे नमूद करीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सातारा येथे टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही. चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातुन बोलुन वेगवेगळ्या वल्गना करताहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अशा पद्धतीच्या वक्तव्याने शिवसेना गप्प बसणार नसून त्या वक्तव्याचा गावा गावांत समाचार घेईल असा इशारा दिला.

अधिक वाचा  चंद्रकांतदादा यांच्या हातात उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं नाही, हे तर बोलघेवडे- राऊत

दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत स्विकृत संचालक म्हणून जायची इच्छा नसल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच पाटण मतदारसंघात हाेत असलेल्या निवडणुका या सेनेच्या चिन्हावरच लढविल्या जात आहेत असेही स्पष्ट केले.