पुणे : नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. कॉंग्रेसनं निवडणुकीच्या आदल्या दिवशीच आपला उमेदवार बदलविला आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसनं छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचा पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अखेर काँग्रेसवरती उमेदवार बदलविण्याची नामुष्की आली असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

दरम्यान उमेदवार बदलविण्याबाबत पक्ष श्रेष्ठीनं पत्र देऊन दिली संमती घेतली असल्याचं महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे येथे स्पष्ट केलं.

आज थोरात पुण्यातील भाषणामध्ये म्हणाले, ‘आज लोकशाही बचाव म्हणण्याची वेळ का येते? याचा विचार करण्याची गरज असून सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आज जगात 51 व्या क्रमांका वर आला आहे. वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरु झालं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा लोकशाहीला होईल अस वाटलं होतं पण 2012 पासून या तंत्रज्ञानावापर हा राजकीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी केला गेला नवी झुंडशाही निर्माण झाली, त्याचा परिणाम हा मतांवर झाला. भाजपने लोकशाही मूल्यांना तिलांजली देण्याचं काम केलं.’ असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

अधिक वाचा  भाजपकडून पटोलेंवर गुन्हा दाखल; 'ते' वक्तव्य भोवणार?अटकेची मागणी