आमचा भगवा ध्वज शिवसैनिकांच्या मनातील आणि सामान्य माणसाच्या सत्तेचे प्रतीक असून आम्हाला कोणत्याही विश्लेषणाची गरज नाही. भगवा ध्वज हा आमचा आत्मविश्वास असून सर्व ‘राजकीय घरी’ फिरून आलेल्या लोकांकडून आम्हाला स्वाभिमान शिकण्याची गरज नाही असा सज्जड दम भरत शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर यांनी कोथरूडमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर युवासेना विस्तारक राजेश पळसकर, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, पुणे महापालिका गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, पुणे शहर महिला प्रमुख सविता मते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैभव दिघे, मयूरी मोहोळ, रोहीत पळसकर, निलेश कंधारे,किशोर गजमल,सुभाष शिंदे,कुमार साबळे,आकाश फाळके व अनेक गणेशोत्सव मंडळातले व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

अधिक वाचा  कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगारास अडचणी

जगामध्ये सर्वत्र कोरोना महामारी संकट असताना आपले सर्वांचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी उद्धव ठाकरे साहेबांनी २ वर्षांमध्ये कुटुंबप्रमुख म्हणून या राज्याचा गाडा पुढे घेऊन जाण्याचे काम केलं. विशेषत: अत्यंत महाभयंकर परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या सर्वांचा कुटुंबप्रमुख रक्षण केलं. त्यामुळे त्यांच नाव जगामध्ये सर्वात चांगलं काम करणाऱ्या घटकांमध्ये मुख्यमंत्री म्हणून घेतलं जातं. आपल्याला सर्वांनाच माहित असेल की घरातला भाऊ पण आपल्याकडे यायला तयार नव्हता, डॉक्‍टर समोर जाण्याची भूमिका घ्यायला तयार नव्हते. त्या काळात सर्वसामान्याला जर कोणी आधार दिला असेल तर ते शिवसैनिकच होते हे कोणी नाकारू शकणार नाही. असेही यावेळी बोलताना अहिर यांनी सांगितले.

अधिक वाचा  माझ्या विरोधात जायचं तिकडे जावं; देश विकणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात आम्हीही जाणार - पटोले

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नवीन लाट निर्माण झाली असुन असंख्य कार्यकर्ते पक्षांमध्ये आपल्याबरोबर सर्वत्र येत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सत्तेच्या मध्यस्थानी आणल्याशिवाय राहणार नाही. आज भारताच्या नकाशामध्ये जागतिक स्तरावर जी शहरे गणली जातात त्यामध्ये मुंबईनंतर पुणे शहराकडे पाहीले जात असतानाही आजच्या सत्ताधारी लोकांनी मात्र या शहराचे विकासाचे मार्ग बंद करण्याचे काम केले. महापालिकेमध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी आज काय परिस्थिती केली आहे. केंद्र सरकारच्या भरोशावर महापालिकेमध्ये स्मार्ट सिटी च्या नावाखाली फक्त घोषवाक्य निर्माण करण्याचं काम केलं.

अधिक वाचा  पुण्यात लवकरच आणखी एका लसीची निर्मिती

आज आपल्याला पाहायला मिळते कि, गटार साफ होत नाही, नाले साफ होत नाही, पाणी येत नाही अशा समस्यांपासून बाहेर जायचं असेल तर देशातील सर्वात सुनियोजित आणि प्रगतशील महानगरपालिका असलेल्या लोकांच्या हातामध्ये शहराचा कारभार देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगितले. मुंबई शहराचा विकास करण्याचं काम पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी व आदित्यजी यांनी केले असून त्यांच्याबरोबर आमच्यासारखे अनेक लोक राजकारणामध्ये असल्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनामध्ये कोथरूड शिवसेना युवासेना व शिवसैनिकांनी सहभाग घेतला.