भारताचा महान ऑफस्पिनर हरभजन सिंग लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. हरभजन इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) भाग राहणार आहे. आयपीएल २०२२च्या एका प्रमुख फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य म्हणून हरभजन सिंग दिसणार आहे.

४१ वर्षीय हरभजनने आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी (KKR) काही सामने खेळले. परंतु लीगच्या यूएई लेगमध्ये तो एकही सामना खेळू शकला नाही. हरभजन सिंग पुढील आठवड्यात स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करेल, अशी चर्चा आहे. त्यानंतर तो एका आयपीएल फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होणार आहे.
आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, ”हरभजनची नवी भूमिका मार्गदर्शक किंवा सल्लागार संघाचा भाग असू शकते. संबंधित फ्रेंचायझीला हरभजनच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायचा आहे. लिलावात खेळाडूंची निवड करण्यात फ्रेंचायझीला मदत करण्यातही तो सक्रिय भूमिका बजावेल.” हरभजन सिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे.

अधिक वाचा  मोबाईलवरुन 2 वर्षाच्या मुलाने केला कारनामा, पालक झाले थक्क