देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. उद्या गुरुवारी वडगाव आणि लष्कर जलकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी गुरुवार आणि शुक्रवार दुपारपर्यंत पाणी जपून वापण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

तसेच पुण्यातील लष्कर जलकेंद्रात आणि वडगाव येथे गुरुवारी देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी पुण्यातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी दीड दिवस पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  Bluetooth Neckband लाँच 8 मिनिटांच्या चार्जिंगवर 8 तास चालते