भारताचे सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होती अशी माहिती समजली आहे. तिघांना वाचवण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टरमध्ये वरिष्ठ अधिकारी होते असंही सांगण्यात येत आहे. तामिळनाडू मधील कुन्नूर परिसरात लष्कराचे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. एकूण 14 जण त्यात होते. लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता अशी माहिती आहे. हेलिकॉप्टर एकूण 14 जण प्रवास करत होते. 4 जण अतिगंभीर, 3 गंभीर तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा  शिवसेना 50 जागा लढवणार, UPमध्ये परिवर्तन निश्चित; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

लष्कराचं हेलिकॉप्टर कून्नूर इथं क्रॅश झालं आहे. बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमध्ये होते, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. त्यांनाही क्रिटीकल इंज्यूरी असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. भारताचे पहिले आणि वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद स्वीकारले होते. याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.