मुंबई : देशासह महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा धोका वाढू लागला आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 21 रुग्ण सापडले असून त्यापैकी 8 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या 6 जणांना तर पुणे इथं एकाला आणि मुंबईतल्या धारावी इथल्या एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे, पण घाबरण्याची गरज नाही, खबरदारी घ्या असं आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात नविन नियमावली लावणार का? याबाबत बोलताना राज्यात पुढच्या दोन-तीन दिवसात परिस्थिती पाहून गाईडलाईन कठोर करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  i phone SE 3 भारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होणार

तसंच सध्या लग्न समारंभांवरही कोणतेही निर्बंध नाहीत, मात्र कोरोनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.