पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत फायरिंग करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सहा गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्याचा भरदिवसा खून करण्यात आला आहे.

समीर शेख असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. साडे बाराच्या सुमारास फायरिंग करून खून करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंतर्गत वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

समीर शेख यांचं वय अंदाजे 30 वर्षे असून समीर फालेनगर येथे राहत असे. समीर शेख यांच्यावर 5 राउंड फायर करण्यात आले आहे. पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला आहे.

अधिक वाचा  शिक्षकांचे प्रशिक्षण आता शुल्क आकारूनच ; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने केले स्पष्ट