मुंबई : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत जगभरात दहशतीचे वातावरण आहे. राज्यात ओमायक्रॉनचे 8 रूग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे देशात एकाच कुटुंबात 9 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. सर्व देश नवीन निर्बंध लादत आहेत. जवळपास सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता जे म्हटले आहे ते परिस्थितीपेक्षा वेगळे आहे. WHO ची चर्चा आश्वासक वाटत आहे.

खतरनाक की ‘सुपर माइल्ड’?

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकार ओमायक्रॉनबाबत शास्त्रज्ञ अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत, परंतु डेल्टा पेक्षाही धोकादायक असण्याच्या शक्यतेमुळे जगातील सर्व देश धास्तावलेले आहेत. ओमायक्रॉनची ओळख पटवणाऱ्या डॉक्टरांव्यतिरिक्त इतर तज्ञांनी याचे वर्णन ‘सुपर माइल्ड’ उत्परिवर्तन म्हणून केले आहे. (धोकादायक असलेल्या ओमायक्रॉनबाबत WHO कडून मोठा दिलासा, पाहा नक्की काय म्हंटलंय?)
डॉक्टर, ज्यांनी ओमायक्रॉनची ओळख पटवली, त्यांनी असेही सांगितले की ज्या चार रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली. त्यांना सौम्य लक्षणे होती आणि ते खूप लवकर बरे झाले. त्यापैकी एकाचाही मृत्यू झाला नव्हता.

अधिक वाचा  कलाकृती व चित्ररूपी माध्यमातून कोथरूड - बावधन कार्यालयाचा स्वच्छतेचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश....!

डेल्टाच्या तुलनेत कसा आहे ओमायक्रॉन?

त्याच वेळी, WHO ने म्हटले आहे की, Omicron कडून आतापर्यंत एकही मृत्यू झाला नाही. या कारणास्तव, कोरोनाव्हायरस तज्ञांना खात्री आहे की नवीन Omicron प्रकार ‘अति सौम्य’ आहे. यामुळेच WHO अनेक देशांना प्रवासावरील निर्बंध उठवण्याचे आणि व्यापक भीती आणि अफवांना आळा घालण्याचे आवाहन करत आहे. WHO म्हटले की, घाबरण्याऐवजी सावधपणे आशावादी रहा कारण दक्षिण आफ्रिकेतील सर्व अहवाल सूचित करतात की नवीन ओमिक्रॉन प्रकार मागील डेल्टा प्रकारापेक्षा जास्त घातक नाही.

जास्त धोकादायक आहे?

युनायटेड स्टेट्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक डॉ फ्रान्सिस कॉलिन्स यांनी सांगितले की, नवीन प्रकार पूर्वीच्या कोविड-19 व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक आहे असे सूचित करणारा कोणताही डेटा अद्याप उपलब्ध नाही. परंतु मला वाटते की ते अधिक सांसर्गिक आहे. दुसरीकडे, वेरिएंटमध्ये 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन आहेत. डेल्टा व्हेरियंटच्या जवळपास दुप्पट, ज्यामुळे ते अधिक संसर्गजन्य बनते. याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, स्पष्ट चित्र दिसण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.