मुंबई : राखी सावंतची ‘बिग बॉस 15’ मध्ये पुन्हा एकदा वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. यावेळी राखी सावंत एकटी नसून तिचा पती रितेशही या शोचा एक भाग बनला आहे. राखी सावंत आणि रितेश हे प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण राहिलं आहेत. या शोमध्ये राखी सावंतने स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. राखी सावंतबद्दलची ही गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. राखी सावंतने बिग बॉसच्या घरात तिच्या शरीराचा एक भाग बनावट असल्याचं वक्तव्य केला आहे.

बिग बॉस 15 चा एक अनसीन व्हिडिओ OTT वर चाहत्यांना खूप आवडला आहे. ज्यामध्ये, बिग बॉस 15 च्या घराचं लाईव्ह स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्मवर केलं जातं. ज्यामध्ये अनेक भाग आणि किस्से एक तासाच्या एपिसोडचा भाग बनत नाहीत. त्याचप्रमाणे राखी सावंतने या सीनमध्ये एक मोठं गुपित उघड केलं तो सीनही एपिसोडचा भाग बनवण्यात आलेला नाही. राखी सावंतने बिग बॉसच्या घरात सांगितलं की, तिचे सगेळे दात बनावट आहेत. राखी सावंतने सांगितलं की, तिला खोटे दात बसवले आहेत.

अधिक वाचा  बाणेर येथून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला

बिग बॉसच्या शोमध्ये राखीने सांगितलं की, तिच्या दातांची किंमत लाखोंमध्ये आहे. राखी सावंतच्या दातांची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय… राखी सावंतला 16 बनावट दात बसवले असून त्याची किंमत 16 लाख रुपये आहे. राखी सावंतने एका दातासाठी १ लाख रुपये दिल्याचं सांगितलं.

जिथे तिला दात बसवण्यात आले, तिथे एका दाताची किंमत 15 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत होती, मात्र तिने 1 लाख रुपयांचे दात बसवून घेतले. राखी सावंतकडून हे ऐकून तेजस्वी प्रकाशलाही धक्का बसला आहे. बिग बॉस 15 मध्ये पतीच्या परिचयानंतर राखीचा हा दुसरा सगळ्यात मोठा खुलासा आहे.