नाशिक: नाशिकमध्ये सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांवरून उडालेला वादाचा धुरळा खाली बसत असतानाच आता संमेलनातील उपस्थितीवरून चर्चा रंगलं आहे. संमेलनाला येण्याचं मान्य करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता वेगळंच कारण पुढं करत संमेलनाला येणार नसल्याचं म्हटलं आहे.

ट्वीट करून फडणीवस यांनी ही माहिती दिली आहे. ‘मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तेथे जाऊन तरी काय करायचे? असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार 'आप'कडून भगवंत मान केजरीवाल यांचा निर्णय