एस टी कर्मचारी संपाबाबत राज्य सरकारची भूमिका लोकशाही विरोधी असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकार दोन पाऊल पुढं येत नाहीये, मेस्मा लावण्याऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहनही फडणवीस यांनी सरकारला केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. आज औरंगाबादमध्ये नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडास्तरीय भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित राहणार आहेत.

संजय राऊतांचे सध्याचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी- फडणवीस
IND vs NZ: मयंकने भारताचा डाव राखला; पटेलने निम्मा संघ गारद केला
आजच्या सामनाच्या अग्रलेखावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे. सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू बदलले आहे आणि त्यांचे नेते आता सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी झाले आहेत, त्यामुळे सामनाच्या टिकेतून तीच प्रचिती येते आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणीस यांनी केली आहे. नायर हॉस्पिटलसारख्या घटना या सातत्याने घडत आहेत. मात्र सरकार यावर काही करत नाही. सरकारला उशिरा जागा येते. ते सत्तेच्या अहंकारात मदमस्त ते झाले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अधिक वाचा  पुणे- शाळा सुरू होणार की नाही आज बैठकीत होणार निर्णय

दरम्यान, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये भाजपची आढावा बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मराठवाडास्तरीय विभागीय आढावा बैठक सुरू झाली आहे. या आढावा बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हावार प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांबरोबर चर्चा केली जात आहे. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत काय चित्र असेल, त्यासाठी काय करावं लागेल यावर चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे.