आज ४ डिसेंबर रोजी संपूर्ण देशभरात नौदल दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कारण ३ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने भारतीय हवाई क्षेत्रावर आणि सीमावर्ती भागावर हल्ला केला. या हल्ल्याने १९७१ चे युद्ध सुरू झाले. या दिवशी भारतने पाकिस्तान विरुद्ध एक मोहीम आखली होती. त्यात आजच्या दिवशी म्हणजे ४ डिसेंबर १९७१ मध्ये ही मोहीम यशस्वीपणे पार पडली म्हणून या दिवशी नौदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

इतिहास
भारतीय नौदल ही भारतीय लष्कराची सागरी शाखा आहे जी १६१२ मध्ये स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या मरीनच्या रूपाने सैन्य तयार केले होते. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) असे नाव देऊन या सेनेपासून नौदलाची सुरुवात केली . भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १९५० मध्ये नौदलाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याला भारतीय नौदल असे नाव देण्यात आले.

अधिक वाचा  जेष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील प्रकृती गंभीर; शुद्ध चार दिवसांपासून हरपली

महत्व
भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाचे आहे. जगातील सर्वोत्तम नौदलामध्ये भारतीय नौसेना पाचव्या क्रमांकावर आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. तर भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाची ताकद वाढवतात.

कराचीचे तेल डेपो सात दिवस जळत राहिले
कराची हार्बर इंधन साठा नष्ट झाल्यामुळे पाकिस्तानी नौदलाचा कणा मोडला होता. कराचीतील तेलाच्या टँकरच्या ज्वाळा ६० किमी अंतरावरून दिसत होत्या. कराचीतील तेल डेपोला लागलेली आग सात दिवसांपासून विझू शकली नाही.

अधिक वाचा  अमोल कोल्हेंच्या पाठीशी...अजित पवारही; 'जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही'

४ डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो?
१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलेल्या भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य लक्षात ठेवण्यासाठी नौदल दिन साजरा केला जातो. ४ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ अंतर्गत पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या ऑपरेशनचे यश लक्षात घेऊन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.