सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरविभागीय मुलींच्या हॉकी स्पर्धा डॉ.दशरथ भोसले हॉकी स्टेडियम चिखली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

त्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी बौद्धिक कौशल्याचा वापर करून अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेचा वापर कशा पद्धतीने करता येईल आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य संपादन करत असताना आपण संपूर्ण क्षमतेचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन विभाग) मा.श्री ए.एम.जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये खेळाडूंनी स्वतःची गुणवत्ता वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण कौशल्याचा वापर केला पाहिजे.तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांगीण गुणवत्ता विकसित करण्याचा प्रयत्न खेळाडूंनी केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षण स्थगित झालेल्या ४१३ जागांसाठी आज मतदान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय हॉकी मुली स्पर्धेचे आयोजन बाबुराव घोलप महाविद्यालयात दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेसाठी पुणे शहर, पुणे जिल्हा व नाशिक जिल्हा या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुणे जिल्हा विभागाने 12 वर्षानंतर विजेतेपद मिळवले आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा विभागाच्या जेष्ठ क्रीडा संचालिका डॉ शोभा शिंदे मॅडम या देखील उपस्थित होत्या. स्पर्धेचे आयोजन बाबुराव घोलप महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ.विद्या पठारे मॅडम यांनी केले होते.तसेच या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

अधिक वाचा  सलमान खान यांच्या महत्वाच्या केस लढणारे वकील श्रीकांत शिवडे यांचं निधन

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची पुण्यतिथी असल्याने श्रद्धांजली वाहण्यात आली .या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका डॉ.विद्या पाठारे यांनी केले.आंतर विभागीय हॉकी निवड समिती सदस्य म्हणून डॉ. दिनेश कराड, डॉ.सुषमा तायडे आणि प्रा.सचिन भोंडवे होते. संघ व्यवस्थापक म्हणून पुणे शहर चे प्रा.विक्रम फाले ,नाशिक विभागात प्रा. सुहास वाघ ,पुणे जिल्ह्याचे प्रा.प्रीती डावरे आणि अहमदनगर विभागात डॉ.उत्तम अनाप होते.यामध्ये नाशिक विभाग, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण संघाने सहभाग घेतला होता.

पहिल्या सामन्यात नाशिक विरुद्ध पुणे जिल्हा या सामन्यात पुणे जिल्हा या संघाने 10-0 असा विजय मिळविला. अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने पुणे शहर संघावर 2-1 असा पराभव करून विजय मिळवला.यासाठी प्रमुख पंच म्हणून श्री.विवेक काळे यांनी काम केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.नरसिंग गिरी ,श्री.प्रणित पावले,श्री. निखिल जाधव, श्री.दिनेश भगत,श्री.नामदेव वरवंटकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष सास्तुरकर यांनी केले तर आभार डॉ.विद्या पाठारे यांनी मानले.