पुन:र्बांधणी म्हणजेच जुन्या इमारतींच्या रिडेव्हलपमेंटच्या विश्वात अग्रेसर असणाऱ्या बढेकर समुहाने भव्य दिव्य प्रकल्प सुरु केला असून असंख्य ग्राहकांची समाधानी प्रतिक्रिया ऐकल्यानंतर नाते विश्वासाचे हे वाक्य या समूहाने सार्थकी मत लावले असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत आमदार व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केले.

पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसाय समूह, बढेकर ग्रूप यांनी कोथरूड मधील पौड रोड येथे त्यांच्या पुष्कर या गृह-व्यवसाय संकुलाचा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दिमाखदार पध्दतीनं पार पडला. कोथरूडचे आमदार व भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि पुण्याचे महापौर मुरलीधार मोहोळ, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, तसेच बढेकर समूहाचे चेअरमन केशवराव बढेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास एलाईट समूहाच्या वतीने संचालक प्रमोद पाटील व विनोद पाटील उपस्थित होते.

अधिक वाचा  तुमचा मृत्यू केव्हा... आता डोळे सांगणार? संशोधकांचा एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम विकसित

चंद्रकांत पाटील यांनी बढेकर समूहाच्या विश्वासानं काम करण्याच्या पध्दतीवर आनंद व्यक्त केला आणि अश्या सुंदर घरांच्या निर्मितीबद्दल प्रविण बढेकर, तसेच बढेकर समूहाचे सर्व सहकारी यांचे कौतूक केले.

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे चोख पालन करून हजारो ग्राहक, शुभेच्छुक, लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. या निमित्ताने पुण्यातील नामवंत गायक आणि वाद्यवृंदांचा सूरस्नेहबंधाचे, हा सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयेजित केला होता.

पुन:र्बांधणी म्हणजेच जुन्या इमारतींच्या रिडेव्हलपमेंटच्या विश्वात अग्रेसर असणाऱ्या बढेकर समूहानं यंदाच्या वर्षी तब्बल ११ नवे गृहप्रकल्प उभारण्याचा निश्चय केला होता. त्याच श्रृंखलेतील पुष्कर हा भव्य दिव्य प्रकल्प आहे. तब्बल २२ मजली गगनचुंबी असणाऱ्या या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या काळाला सुसंगत अश्या सोयी सुविधा, प्रत्येक पिढीला कुटुंबाला सामावून घेणारी घरं पुष्कर या प्रकल्पात साकारली जाणार आहेत.

अधिक वाचा  जेष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील प्रकृती गंभीर; शुद्ध चार दिवसांपासून हरपली

त्याच बरोबर व्यवसायिकांना मोक्याच्या ठिकाणी शॅप्स व ऑफिसेसचा देखील समावेष या प्रकल्पात करण्यात आला आहे. कोथरूडच्या वाढत्या विस्तारणा-या प्रभागात बढेकर ग्रूपचा पुष्कर हा प्रकल्प एकमेवाव्दितीय असाच ठरणार आहे.

बढेकर ग्रूप आणि एलाईट ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुष्कर हा प्रकल्प लवकरंच आकारास येईल असे प्रतिपादन बढेकर समूहाचे संचालक श्री प्रविण बढेकर यांनी केले. बढेकर ग्रूपच्या ११ प्रकल्पाचे काम देखील वेगाने सुरू असून लवकरच ग्राहकांना सुरक्षित आणि आकर्षक घरांचे हस्तांतरण होईल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचा शेवट सर्व उपस्थितांच्या स्नेहभोजनाने झाला.