भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहली भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असून, तो संघात पुनरागमन करत आहे.

न्यूझीलंडची कमान केन विल्यमसन ऐवजी टॉम लॅथमकडे सोपवण्यात आली आहे. कानपूर येथील ग्रीन पार्क येथे खेळवण्यात आलेला या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने खेळपट्टी ओली आहे. त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला आहे.

खराब परिस्थितीमुळे नाणेफेक होणार नसल्याची पुष्टी झाली असून, सकाळी साडेदहा वाजता आणखी एक तपासणी होणार आहे. टॉम लॅथमची पंचांशी चर्चा सुरू होती. केन विल्यमसन दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.

अधिक वाचा  ‘पुष्पा’ सिनेमातल्या शेषाचलम जंगलाबद्दल थक्क करणाऱ्या गोष्टी…

भारतीय संघात मोठे बदल

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. या तिघांनाही दुखापतीच्या समस्या असल्याची माहिती मिळाली आहे. इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.

पहिल्या कसोटीत जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि स्कॅनमध्ये सूज असल्याचे दिसून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना रहाणेला हाताला किरकोळ दुखापत झाली. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.