झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले. या मालिकेच्या पहिल्या सिझनने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ‘देवमाणूस’मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. पण या वेळी ‘देवमाणूस २’मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड दिसणार नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अधिक वाचा  कर्णधार म्हणून BCCI ने दिलेली मोठी ऑफर विराटने नाकारली

किरण गायकवाडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘पण यावेळी मी नाही’ असे म्हटले होते. ‘देवमाणूस २’मध्ये किरण गायकवाड दिसणार नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता डॉक्टर अजित कुमारच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.