पक्षांतर्गत वाद-विवाद…… आरोप-प्रत्यारोप…….. हे सध्या राजकीय जीवनात नित्याचे झालेले असतानाही काल (दि.२९) पुणे शहर राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात माञ कोथरूड विधानसभा मतदार संघातील दोन कार्यकर्ते आप-आपापसात भिडले आणि मुद्याची लढाई गुद्यावर गेली. त्यानंतर पक्ष कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांनी दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या व्यक्तीला जास्त आघात (प्रसाद…) झाला त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर संबंधित प्रकाराची चर्चा पुणे शहरात सुरू झाली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये वर्षानुवर्ष माहिती अधिकार कार्यकर्ते माजी पदाधिकारी आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष यांच्यामध्ये असलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. आज पर्यंत माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी सार्वजनिकरीत्या व सोशल मीडिया (Facebook, what’s app) वरती  उपाध्यक्ष यांच्यावरती केलेले आरोप सार्वजनिक चर्चांचा विषय बनत होते. वारंवार पक्ष जबाबदारीत असणाऱ्या उपाध्यक्ष यांनी याला कधी प्रत्युत्तर देण्याचा मानस ठेवला नाही; परंतु आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात हे दोन कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि नंतर जे घडायचं ते घडलंच…… काही काळातच पक्ष कार्यालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  सलमान खानच्या घराखाली फायरिंग करणारा कालू कोण ? जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झालेल्या प्रकाराबद्दल पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे फिर्याद दाखल केली असून कलम 504 506 नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उपाध्यक्ष यांनीही शहर अध्यक्ष माननीय प्रशांत जगताप यांच्याकडे संबंधित प्रकाराबाबत लेखी तक्रार केली असून संबंधित व्यक्ती आपल्याकडे खंडणीसाठी वारंवार फोन करत असल्याचे लेखी नमूद केले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या बांधकामांची माझा काहीही संबंध नसून मी नियमित नोंदणीकृत कामे करत असून हा माझा व्यक्तिगत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे.

अधिक वाचा  यूपीएससीचा १८० IAS, २०० IPS आणि ३७ IfS पदे अंतिम निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम

….. कौटुंबिक हीन शब्दउच्चारांमुळे राग अनावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वर्षानुवर्ष अत्यंत समर्पित आणि कोणत्याही पदाची अपेक्षा न करता मी काम करत आहे परंतु माझ्या कामामुळे मिळत असलेल्या माझ्या संधी अनेकांना पोटशूळ देऊन जातात. कोणतेही कार्य न करता फक्त पदेच मिळवण्यासाठी अनेक पदाधिकारी पक्ष कार्यालयात वारंवार भटकत असतात. संबंधित व्यक्ती हा खंडणीखोर असून अन्य पदाधिकाऱ्यांना धमकावणे हा त्याचा रोजीरोटीचा व्यवसाय आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये संबंधित व्यक्तीने अनेक व्यवसायिकांना जेरीस आणले असल्याच्या तक्रारी मी वारंवार पक्ष कार्यालयाच्या निदर्शनास आणून कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज कामानिमित्त मी पक्ष कार्यालयात गेलो असता संबंधीत खंडणीखोर माझ्या समोर आल्यानंतर त्यांनी हीन आणि कौटुंबिक पातळीवरची शिवीगाळ केल्यामुळे माझा राग अनावर झाला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात उल्लेख केलेल्या कोणत्याही बांधकामांत माझा संबंध नाही.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळांवर आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल धार्मिक प्रलोभनाचा आरोप; भरारी पथकांचे हे आश्वासन

उपाध्यक्ष – पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

व्यक्तिगत आरोपातून घडलेला प्रकार

संबंधित दोन्ही पदाधिकारी एकाच मतदारसंघात असून वर्षानुवर्षे त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद -विवाद घडत असल्याचे तक्रारदाराच्या Facebook Page वरून जाणवत आहे.

पक्ष कार्यालय मध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकत्र येणे साहजिक आहे; परंतु पक्ष कार्यालयाचा वापर अंतर्गत वादासाठी करणे चुकीचे असून दोघांनाही आपले म्हणणे लेखी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोघांनाही समज देण्यात येईल. पक्ष विचार किंवा पक्ष संघटनेच्या संदर्भात कोणताही विषय नसल्याने मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही.

            मा. प्रशांत जगताप
शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर