सुतारदरा माघातील नागरिकांसाठी स्वारद फाउंडेशन च्या वतीने तीन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कीर्तनकारांचा आस्वाद समस्त नागरिकांना घेता येणार आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून स्वारद फाऊंडेशन तर्फे स्वारद फाऊंडेशन आयोजित भव्य किर्तन महोत्सव बुधवार दि. ०१/१२/२०२१/ ते शुक्रवार दि. ०३/१२/२०२१ रोजी रात्री ८ ते १० वा. आयोजित केला आहे. किर्तन महोत्सव २०२१ श्रीमंत दक्षिण मुखी मारुती मंदिर समोर, म्हातोबानगर रोड, कोथरुड येथे आयोजित केले असल्याचे स्वातीवहिनी शरद मोहोळ संस्थापिका- स्वारद फाऊंडेशन यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुरुषप्रधान रुढी, परंपरांना मोडीत काढत पंचकन्यांकडून वडिलांच्या पार्थिवाला खांदा!

बुधवार ०१.१२.२०२१ रोजी रात्री ८ ते १० वा. किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख), गुरुवार ०२.१२.२०२१ रोजी रात्री ८ ते १० वा. किर्तनकार- ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (मायेचा सागर फेम…), शुक्रवार ०३. १२. २०२९ रोजी रात्री ८ ते १० वा. किर्तनकार ह.म.प. पांडुरंग महाराज शितोळे (शास्त्री) यांचे कीर्तने होणारं आहेत. सुतारदरा व कोथरूड भागांतील भजनी मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजनात वारकरी सांप्रदाय कोथरुड, मुळशी, मावळ तालुका टाळकरी, माळकरी, भजनकरी, विणेकरी, गायक, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे आयोजक व स्वागतोत्सुक स्वातीवहिनी शरद मोहोळ यांनी सांगितले.