भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आणखी एक संधी आहे. उत्तर मध्य रेल्वेने क्रीडा कोटा अंतर्गत भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. rrcpryj.org वर भेट देऊन अधिकृत अधिसूचना तपासू शकता. एकूण रिक्त पदांची संख्या २१ आहे.

वायोमार्यदा काय?
उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. श्रेणीनुसार वयोमर्यादेत कोणतीही सूट दिली जाणार नाही.

पगार किती?
निवडलेल्या उमेदवारांना सातव्या सी पी सी (CPC) नुसार २०,२०० रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क किती?
अर्जदारांना परीक्षा शुल्क म्हणून ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अधिक वाचा  'शिवसेनेनं बाबरीनंतर सीमोल्लंघन केलं असतं तर आज पंतप्रधान सेनेचाच असता'- उद्धव ठाकरे

कोण भरतीमध्ये भाग घेऊ शकतं?
क्रिकेट, हॉकी, बॉक्सिंग, अॅथलीट, जिम्नॅस्टिक, पॉवर लिफ्टिंग, टेनिस, टेबल टेनिस आणि वेट लिफ्टिंग या खेळांमध्ये खेळणारे खेळाडू या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता काय?
अर्जदाराला इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याच वेळी, जे रेल्वेच्या तांत्रिक पदांसाठी अर्ज करत आहेत, त्यांनी शिकाऊ उमेदवारी/आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.