साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार धनुष बॉलिवूडमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरहिट चित्रपटात त्याने उल्लेखनीय भूमिका बजावल्या आहे. नुकतंच धनुषला ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘असुरन’ या तमिळ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते वेत्रीमारन यांनी केले आहे. या चित्रपटात धनुषने डबल रोल साकारला आहे.

विशेष म्हणजे धनुषला याआधी याच चित्रपटातील अभिनयासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर आता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. नुकतंच 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) रविवारी पार पडला. असुरन हा चित्रपट ४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. असुरन हा चित्रपट वास्तविक जीवनातील १९६८ मधील किल्वेनमनी हत्याकांडापासून प्रेरित आहे. या चित्रपटातील धनुषच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

अधिक वाचा  सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी

असुरन’ या चित्रपटात धनुषने शिवस्वामी नावाच्या शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. त्याची पत्नी पचयम्माची भूमिका अभिनेत्री मंजू वारियरने साकारली आहे. सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा ‘अतरंगी रे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.